शरद पवार | रामदास आठवले | सातारा | महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमधील ऐकमेंकांची आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगली सुरू आहे. तसेच महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्यामुळे सर्व राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमिवर काल म्हणजेच 12 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये ‘उत्तर सभा’ घेतली.
राज ठाकरेंनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे जातीवादीय आहेत, असं वक्तव्य केलं होतं. परंतू त्यांच्या याच वक्तव्याला रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. शरद पवार हे जातीयवादी नाहीत, त्यामुळे राज ठाकरेंनी केलेलं भाष्य हे खोटं आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
आज रामदास आठवले सातारा दौऱ्यावर होते. साताऱ्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना आठवलेंनी मनसेवर चांगलीच निशाणाबाजी केली असल्याचं दिसून आहेत. तसेच, कालच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला होता. मात्र याच मुद्यावरून रामदास आठवले मनसेवर कडाडले आहेत.
“भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज,” असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :


