मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहितने टायमिल मिल्सला पुन्हा संघात आणले आहे. मुंबईने मागील त्यांचे चारही सामने गमावले आहेत. त्यामुळे प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आतापासून मोठे विजय आवश्यक आहेत. पंजाबने त्यांच्या चार सामन्यांपैकी दोन विजय मिळवले आहेत.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने १४ सामने जिंकले असून पंजाब किंग्जने १३ सामने जिंकले आहेत. या मोसमातील उभय संघांमधील हा पहिला सामना आहे. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक ७४० धावा केल्या आहेत. शिखर धवनने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध २६ आयपीएल डावांमध्ये ८०१ धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांची Playing XI
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
- गव्हाच्या पेरणीतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 31 हजार स्क्वेअर फुटांचे पोट्रेट
- “राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज”- जयंत पाटील
- नवनीत राणांना मिळणार वाय प्लस सुरक्षा, VVIP श्रेणीत समावेश
- आलिया-रणबीरच्या लग्नावर बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अलीने केले ‘हे’ वक्तव्य
- राज यांच्या शिवरायांचं नाव न घेण्याच्या टीकेवर शरद पवारांचं उत्तर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

