Share

IPL 2022 : यंदा RCB जिंकणार आयपीएल ट्रॉफी? दिनेश कार्तिकनं दिलं ‘असं’ उत्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने यंदाच्या हंगामात आपल्या संघाच्या आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यतेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल २०२२मध्ये बंगळुरू संघ फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मागील हंगामात विराट कोहलीने संघाचे नेतृत्व सोडले. आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही.

यंदा आरसीबीकडे असे काही खेळाडू आहेत जे संघाला ट्रॉफी मिळवून देऊ शकतात. या संघाने आतापर्यंत पाचपैकी तीन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. आरसीबी सहा गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी कार्तिकला विचारण्यात आले होते, की यावेळी आरसीबी आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना हसत तो म्हणाला, “मी सांगू शकत नाही पण संघातील वातावरण चांगले आहे. मला वाटते की आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. चेन्नईने २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या होत्या. शिवम दुबेने नाबाद ९५ आणि रॉबिन उथप्पाने ८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ९ बाद १९३ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!