मुंबई : प्रकृती अस्वस्थामुळे धनंजय मुंडे यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्राकृती स्थिर आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांची बहीण पंकजा मुंडे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली.
या वेळी त्यांनी आपले भाऊ धनंजय मुंडे यांना धीर दिला. “काळजी घे, दगदग नको करु ! तब्येतीला जप, शेवटी तब्येत महत्त्वाची आहे,” असा सल्ला पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना दिला. यावेळी मातोश्री प्रज्ञा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडेंना मंगळवारी सकाळपासून अस्वस्थ वाटत होते. ते सायंकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी होते. तेथे सायंकाळी त्यांना अचानक चक्कर आली. नंतर मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या :
राज ठाकरे यांच्या शरद पवार नास्तिक असल्याच्या आरोपावर पवारांचे प्रत्युत्तर
IPL 2022 MI vs PBKS : रोहित शर्मानं जिंकला टॉस; मुंबई इंडियन्स संघात एक बदल!
गव्हाच्या पेरणीतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 31 हजार स्क्वेअर फुटांचे पोट्रेट
“राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज”- जयंत पाटील
नवनीत राणांना मिळणार वाय प्लस सुरक्षा, VVIP श्रेणीत समावेश


