Share

चांगल्या कामात उशीर कशाला ? आजारातून मुक्त होताच शरद पवार ‘एक्शन मोड’मध्ये

Published On: 

मुंबई : देशात कर्करोगाची समस्या खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगावरील उपचार पद्धती देखील आधुनिक झाली असून यशस्वीरित्या यावर मातही करता येतं. दरम्यान, उपचाराची गरज आणि उपलब्ध सुविधा यात मोठी तफावत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने रुग्णांच्या सोयीसाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर अनेकांची राहण्याची अडचण होते. टाटा रुग्णालयाच्या रस्त्यांवर, आजूबाजूच्या पुलाखाली रुग्णांचे नातेवाईक दिवस काढतात. रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुंबईत राहण्याची सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड याबाबत सकारात्मक व तातडीने हालचाल करून म्हाडाकडून टाटा रुग्णालयापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हाजी कासिम चाळ परिसरातील १०० सदनिका म्हाडाने टाटा रुग्णालयाला देऊ केल्या आहेत. तर, रुग्णांच्या नातेवाईकांना सदनिका देण्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये यासाठी ही जबाबदारी टाटा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे देण्यात आली आहे.

या निर्णयामागे मुख्यमंत्री महोदयांचे मोठे योगदान असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच सदनिकांच्या चावीचे वाटप हे कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेले खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी दोन महिन्यांपूर्वी माध्यमांशी बोलताना दिली होती.

यानंतर, पोटदुखीमुळे शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने उदघाटन थांबले होते. दरम्यान, शरद पवार हे आता आजारातून मुक्त झाल्यानंतर आव्हाडांनी काल त्यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी या सदनिकांच्या कामाबाबत विचारले असता उदघाटन राहिले असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. यावर चांगल्या कामात उशीर कशाला ? असं म्हणत याच आठवड्यात उदघाटनाचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ‘काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला. मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत,’ अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!