सिंधुदुर्ग : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोले यांच्या या विधानानंतर आता भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात शिवसेनेला आव्हान दिलं आहे. ‘नानांनी कचराच करून टाकला… आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याच्या सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
नानांनी कचराच करून टाकला… आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याचा सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे. https://t.co/dfSZVoOJMH
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 10, 2021
दरम्यान, नाना पटोले यांच्या आणखी एका धक्कादायक विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची शक्तिस्थळे मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं विधान त्यांनी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देवियो-सज्जनो, हो जाइए तैयार’ ; केबीसीसाठी आज रात्रीपासून नोंदणी सुरू
- लता मंगेशकर यांनी जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे पत्र लिहीत केले कौतुक
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सकडून घडली छोटीशी चुक, ‘मयंती’ऐवजी केले ‘मयंक’ला टॅग


