Share

‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर

Published On: 

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मातृ दिनानिमित आईसोबतचे फोटो शेअर केले आणि आपल्या आईला मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील आई डिंपलसोबतचा फोटो शेअर केला. पण या फोटोची सध्या वेगळ्याच कारणाने चर्चा रंगली आहे. ट्विंकलच्या या पोस्टवर एका युजरने प्रश्न विचारला आणि ट्विंकलने पती अक्षय कुमारवरच विनोद करत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

https://www.instagram.com/p/COpyrrtpVF5/?utm_source=ig_web_copy_link

फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असलेला फोटो ट्विंकलने शेअर केला होता. यात ट्विंकल आणि तिची आई डिंपल आपल्या कामात बिझी असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत ती लिहिते की, ‘सद्यपरिस्थितीत आम्ही मदर्स डे मस्त साजरा केला. आम्हा दोघींचेही हात रिकामे राहू शकत नाही. आई स्केचिंग करतेय आणि मी माझे एम्ब्रॉडरी वर्क करतेय शिवाय सोबत मस्तपैकी गप्पा सुरू आहेत. हॅपी मदर्स डे,’ या कॅप्शनसह ट्विंकलने हा फोटो शेअर केला.

या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या यात एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करताना एक वेगळाच प्रश्न विचारला. असले फोटो तू क्लिक कशी करतेस? असे फोटो क्लिक करण्यासाठी तुझ्याकडे एखादे खास डिव्हाइस आहे का? असे त्याने विचारले. यावर तिने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. ‘हाहाहा, माझ्याकडे नवरा आहे, जो असे फोटो क्लिक करतो. दुस-या शब्दांत सांगायचे तर हो, माझ्याकडे हे एक खास डिव्हाइस आहे,’ असे उत्तर तिने दिले आहे. तिच्या याच हटके उत्तरमुळे या पोस्टची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!