सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटला आहे. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळविण्याच्या निर्णाया वरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरकरांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित पुण्यातील सिंचनभवनात दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक होत आहे.
दरम्यान,यावेळी बोलताना भरणे म्हणाले, एक ठिपका पाणीही सोलापूरचं घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही. सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचा राजीनामा देईल अशी भूमीका भरणे यांनी घेतलीय.
यावेळी बोलतांना भरणे यांनी या सगळ्या बाबत गैरसमज झाला असून तो दूर करण्यासाठी ही बैठक असून यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप भरणे यांनी केलाय. दरम्यान, भरणे यांच्या या भूमिकेवर आता त्या ठिकाणी जमलेले शेतकरी आणि नेते हे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

