औरंगाबाद : कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोना संसर्गाने अनेकांचा बळी जातोय. तर काही ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा मृत्युला कारणीभूत ठरतोय. अशा परिस्थितीतही अनेक पत्रकार जीवावर बेतून वार्तांकन करत आहेत. समाजात घडणारी सत्य स्थिती माध्यमांद्वारे ते सर्वांसमोर मांडत आहेत. पण ही गोष्ट काही लोकांना खटकत आहे. कोरोनाच्या बातम्यांमुळे समाजात भीती निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
त्या अनुषंगाने लोकांच्या मनात धडकी भरविणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्यांना आवर घालावा यासाठी मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. पण ही जनहित याचिका न्या. संजय व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी नामंजूर केली आहे.
हृदय हेलवणारी दृश्ये, आणि मृत्युंच्या वृत्तांकनामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होतेय. पाहण्यात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे नैराश्य वाढल्याचा दावा जनहित याचिकेत करण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाशी संबंधित खळबळजनक बातम्या दाखवण्यास वृत्तवाहिन्यांना बंदी घालावी. त्यासाठी नियामक मंडळ स्थापन करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.
याचिकेत काय म्हटले होते?
औरंगाबाद येथील अमित कांतीकुमार जैन यांनी ॲड. कुलदीप कहाळेकर यांच्यामार्फत खंडपीठात ही जनहित याचिका दाखल केली होती. वृत्तवाहिन्या दिवसभर कोरोनाविषयक बातम्या दाखवतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती वाढत जाते. शिवाय यामुळे गैरसमजही निर्माण होत आहे. सतत स्मशानभूमीचे व्हिडिओ, हॉस्पिटलबाहेर रडणारे नातेवाईक दाखवले जातात. त्याचा परिणाम होऊन नागरिकांचे विचार नकारात्मक होतात, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.
काय म्हणाले कोर्ट?
याचिकेवर औरंगाबाद खंडपीठ म्हणाले की, आम्ही या सादर याचिकेची जनहित याचिका म्हणून कल्पना करु शकत नाही. सर्व भाषिक वृत्तवाहिन्या खोटी बातमी दाखवितात, भडक बातम्या दाखवितात अथवा त्यांची विशिष्ट बातमी खळबळजनक दाखविल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केलेली नाही. सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून मीडियाला प्रतिबंधित करता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.
महत्वाच्या बातम्या
- प्रत्यर्पण टाळण्यासाठी फरार नीरव मोदीने केली ‘ही’ नवीन खेळी
- संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला करणारे चार आरोपी अटकेत, इतर समाजकंटक फरार
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- लता मंगेशकर यांनी जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे पत्र लिहीत केले कौतुक
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

