नवी दिल्ली : देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. जवळपास महिनाभर कडाक्यातील थंडीत दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील भेट घेतली होती. त्या शिष्टमंडळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या नेत्यांचा समावेश होता.
यानंतरही अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महिना झाला असून शरद पवार हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी केंद्र सरकारला ३० डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ‘ 30 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास विरोधी पक्षाला त्याचा विचार करावा लागेल,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे.
पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यातून काही मार्ग निघणार नाही का? सर्वजण जीवन संपवण्याच्या मार्गाने जाणार आहेत का? त्यामुळे राजकीय पक्षांनाही याबाबतचा विचार करावा लागेल. आता केंद्राने 30 तारखेला शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. ठिक आहे. 30 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यातून तोडगा निघाला नाही तर आम्हाला बसावं लागेल. विरोधी पक्षांना त्याचा विचार करावा लागेल, असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षाचा शेवट गोड! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
- काँग्रेसशिवाय मुंबईत शिवसेनेचा महापौर शक्य नाही; काँग्रेस नेत्याचं सूचक वक्तव्य
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेच्या चाैंडी गावात पुतण्यानेच थोपटले काकांच्या विरोधात दंड
- ‘मार्च’नंतर हे सरकार दिसणार नाही; राणेंनी सांगितला महाआघाडी सरकार कोसळण्याचा नवा मुहूर्त!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
