Share

Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे शरद पवार चेकमेट झालेत – अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये अनेक नेत्यांवर इडीने केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. अशातच पवारांनी केलेल्या टीकेला भाजप पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे शरद पवार चेकमेट झाले आहेत. त्यांच्या पक्षाचा भ्रष्टाचार आता उघडकीस आल असल्याचं म्हणत अतुल भातखळकरांनी शरद पवारांना चांगलच फटकारलं आहे.

शरद पवार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. यांची ही जुनीच तबकडी आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन करणं आणि त्यांना मंत्रीपदावर ठेवणं, यावरुन शरद पवार यांच्या पक्षाचं चारित्र्य काय आहे हेही लक्षात येतं असल्याचं भातखळकर म्हणाले आहेत. तसेच ते असंही म्हणाले की, संजय राऊत यांच्या अटकेला एक महिना होत आहे. चला या निमित्ताने शरद पवार यांना कंठ फुटला. त्यांना संजय राऊत यांचं समर्थन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण, एकमेकांना सांभाळू आणि दोघे मिळून खाऊ, असं सुरु आहे.

दरम्यान, देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!