Share

CM Eknath Shinde | मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रिटचे करणार ; एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती

Published On: 

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे टप्प्या टप्प्याने काँक्रीटीकरण करणार अशी माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबई शहरातील रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच मुंबई महापालिकेचे आयुक्त, विविध अधिकारी आणि तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुंबईतील रस्ते काँक्रीटचे करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया आणि कार्यवाही पूर्ण केली जात आहे. हे काम विहीत काळात पूर्ण केले जाईल याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

पुनर्वसनासाठी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील-

मुंबई शहरातील मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलपर्यंतचा रस्ता प्रकल्पाचा विशेष पायाभूत सुविधा प्रकल्पात समावेश केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या रस्त्यावरील काही ठिकाणी झोपडपट्टी आहे. तिथे व्यावसायिक उपक्रम चालवले जातात. त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील. त्याचबरोबर याबाबत तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्ती यांची एक समितीही नियुक्त करण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भूसंपादन कार्यवाही सुरू आहे-

मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलपर्यंतचा रस्ता प्रकल्पाची लांबी ५.२ किलोमीटर आहे, पैकी मागाठाणे ते सिध्दार्थ नगर दरम्यान भूसंपादन कार्यवाही सुरू आहे. सिध्दार्थ नगर ते लोखंडवाला संकुल दरम्यानच्या सिध्दार्थ नगर ते एसीपी कार्यालयापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. पुढील भागात झोपडपट्टी आहे. सदरच्या झोपडपट्टी धारकांची त्याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी आहे. त्यामुळे निष्कासन कारवाई प्रलंबित आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी एकत्रित चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

यावरील चर्चेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सवश्री सुनील प्रभू, पराग अळवणी यांनी सहभाग घेतला.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!