Share

… तोपर्यंत मंदी हटवणे अशक्य : पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आल्याचे चित्र आहे. भारताचा विकासदर हा गेल्या आठ वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ५ टक्के इतका आहे. त्यामुळे योग्य पावले न उचलल्यास भारतात मंदी येण्याची शक्यता आहे.

याविषयी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे त्यांनी ‘सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत व्यापार वाढत नाही. पर्यायाने व्यापार आणि उद्योग वाढवल्याशिवाय मंदीतून बाहेर पडणं शक्य होणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत लोकांना कमी करण्यापेक्षा संबंधित उद्योग संस्थांनी स्वतःचा खर्च कमी करून या संकटाला सामोरं जावं असं विधान पवार यांनी केले आहे.

पुढे बोलताना पवार यांनी ‘काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्टामुळे आज देशात शेतमालाची कमतरता नाही. एकेकाळी आयात करणारा भारत देश निर्यातदार बनलाय. मात्र असं असलं तरी सरकारच्या धोरणामुळे अनेकदा संकटं येतात. शेतमालाचे दर वाढले की परदेशातून माल आयात केला जातो, ही बाब शेतकऱ्यांसाठी घातक आहे असंही पवार म्हणाले.

दरम्यान, माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहनसिंह यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीकडे चालला आहे असं विधान केले आहे. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटबंदी आणि जीएसटी यासारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!