Share

‘भाजपमध्ये मेगाभरती नाही, ठराविक नेत्यांनाचं प्रवेश दिला जातोय’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. आजही सोलापूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत अनेक नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.

या पक्षांतारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मेगागळती सुरु आहे, मात्र भाजपमध्ये मेगाभरती नाही. ठराविक नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली, यांच्या पाठीशी उभं राहायला कोणीही तयार नाही अशी टीका कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर केली आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘भाजप तरी निवडक लोकांनाच प्रवेश देत आहे. युतीचा विचार करुनच पक्षप्रवेश सुरु राहतील. एखाद-दुसऱ्या जागेचा प्रश्न निर्माण झाला, तरी आम्ही सोडवू. मात्र तिकीट द्यावे लागतील असे चार जणच घेतले आहेत. फार तर आणखी चार-पाच घेऊ, बाकी तर पक्षात घेतच राहू, असं मोठ विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी ‘मूळ भाजप ९७ -९८ टक्के आहे, घेतलेले लोक २-३ टक्केच आहेत. त्यामुळे फार फरक पडणार नाही. शक्तीसंचय केलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल शिवसेनेलाच माहिती, आम्ही काय त्यांना घेत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!