Share

कॉंग्रेसमध्ये आश्वासनं पाळली जात नाहीत : पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी नारायण राणेंच्या कॉंग्रेस प्रवेशावर भाष्य केले. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. एक राष्ट्रवादी आणि दुसरी काँग्रेसची. त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही असं विधान केले.

तसेच पवार यांनी पुढे बोलताना ‘नारायण राणे यांना नेतृत्व करायला देऊ असं आश्वासन दिलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं आश्वासन दिलं हे लक्षात ठेवायचं असतं. काँग्रेसमध्ये असे निर्णय होत नाहीत. काँग्रेसमध्ये आल्यावर चार पाच महिन्यात काही घडेल, अशी अपेक्षा ठेऊ नका, असा सल्ला मी त्यांना तेव्हाच दिला होता. तुम्ही काँग्रेसमध्ये नवीन आहात. आमचं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं असंही सांगितल्याचं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, पुढे बोलताना ‘विरोधी पक्षात काम करण्याचा जो आनंद मिळतो, तो सत्तेत मिळत नाही. विरोधात असताना शेवटच्या माणसाला भेटता येतं. आपल्यावर कोणती जबाबदारी नसते. त्यामुळे बोलताही येतं. सत्तेत आल्यावर अनेक बंधनं येत असतात असंही शरद पवार यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!