Share

त्या काळात होणारी पोटदुखी टाळण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महिलांना मासिक पाळीचे दिवस म्हणजे भीतीदायक स्वप्नासारखेचं असते. मासिक पाळीच्या दरम्यान पोट दुखी, कंबर दुखी आणि थकवा आपल्याला अंथरून ठरायला भाग पडतात. दरम्यान या काळात वेदनापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय.

रताळी खाल्ल्याने मासिक पाळीच्या काळामध्ये वेदना कमी होतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जस्मिन फ्लेवरचा चहा घेतल्याने शरीर आणि मन आनंदी राहते. तसेच त्या काळामध्ये आपल्या नाश्त्यामध्ये १ ग्लास दुधाचा समावेश करावा. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पपई खाल्ल्याने होणारा प्रवाह नियंत्रणीत होतो.

याच प्रमाणे गाजर खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतात. तसेच या दिवसांमध्ये गाजराचा जूस घेतल्याने आराम मिळतो. कोरफड जूस मधाबरोबर घेतल्याने या दिवसांमध्ये होणार्या वेदना कमी होतात. आणि प्रवाह नियंत्रणीत राहतो.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा. यामुळे पोट आणि पाठीला आराम मिळतो. या दिवसांमध्ये शक्य तेवढा आराम करा. पुस्तके वाचा तुम्हांला आवडणाऱ्या गोष्टी करा यामुळे मन आनंदी राहील. या सोबतच पाळीच्या काळात हलके व्यायाम करा. घट्ट कपडे घालणे शक्यतो ताळा. मिठाचे सेवन कमी करा. यामुळे वेदना कमी होतील.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!