🕒 1 min read
नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या भर कार्यक्रमामध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या 2 कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर शाई फेकली आहे. गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकल्यानंतर राज्यात पुन्हा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली एकप्रकारे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कुबेरांनी लिहलेले पुस्तक मी स्वत: वाचलेले आहे. लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार असल्याने व्यक्त होण्याची भूमिका ते घेऊ शकतात. त्या मतांना विरोध करणारे काही घटक असू शकतात, असं शरद पवार म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाई फेकीवर भाष्य केले आहे.
भारत देशात आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्विकारले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानंतर आपल्या मनाविरुद्ध लिहली तर त्याचा व्यक्तिगत हल्ला करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे. या गोष्टी महाराष्ट्राला शोभत नाहीत, असं शरद पवार म्हणाले आहेत.
मी काही इतिहासाचा एक्स्पर्ट नाही. मी त्याच्या खोलात कधी गेलो नाही. परंतु तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही ते लिहू शकता. तुम्ही बोलू शकता पण हल्ला करु शकत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, गिरीश कुबेरांनी संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे गिरीष कुबेर यांच्या अंगावर शाई फेकली असल्याचे शाई फेकणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या दोघांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कुबेर यांच्या अंगावर शाई फेकून आम्हाला समाधान वाटले आहे. यासाठी आम्ही फासावरही जायला तयार असल्याचे त्या दोघांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा राऊतांकडून निषेध
- …पण ती संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; दरेकारांचं शाईफेकला समर्थन
- गिरीश कुबर यांच्यावर भर संमेलनात शाई फेक
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- ‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
