Share

ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत

Published On: 

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतल्याननंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर ममता यांनी भाजप सोबतच कॉंग्रेसवर देखील निशाणा साधला होता.दरम्यान, ममतांच्या या दौऱ्याविषयी राऊत यांनी आपल्या सामनाच्या रोखठोकमधून भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांसमोर नारा दिला, ‘जय बांगला, जय मराठा!’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे. मुंबईत येऊन त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. ती भेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणामुळे झाली नाही. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालात जो ‘खेला होबे’ केला, दिल्लीचा अतिरेक रोखण्याचा, तोच खेळ महाराष्ट्रात झाला. सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता. एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही. ममता बॅनर्जी त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटले. ही बहीण सिद्धिविनायक मंदिरात गेली. गणपतीपुढे नतमस्तक झाली व हात जोडून तिने उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. संध्याकाळच्या भेटीत त्या म्हणाल्या,’गणपतीचा ‘लाडू’ म्हणजे मोदक मला फार आवडतो. कोलकात्यातील मराठी लोक मला नेहमी मोदक पाठवतात. कोलकात्यात मराठी समाज आहे. त्यांचे आमचे संबंध उत्तम आहेत. महाराष्ट्र मंडळात आमच्या नियमित बैठका होत असतात. प. बंगालचे महाराष्ट्राशी नाते कायम टिकले पाहिजे,’ असा आशावाद ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ममतांच्या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल(Bhupendra Patel) त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. ‘व्हायब्रण्ट गुजरात’साठी मुंबईतील उद्योगपतींना गुजरातचे निमंत्रण देण्यासाठी ते आले. आत्मनिर्भर गुजरात उभारण्यासाठी त्यांना मुंबईतील उद्योगपतींची मदत हवी. म्हणजे गुजरातचा औद्योगिक विकास व अर्थकारण मुंबईवर अवलंबून आहे व खुंटा बळकट करण्यासाठीच मुख्यमंत्री पटेल येथे अवतरले, असेच भाजपचे मत असायला हवे. श्री. पटेल यांनी मुंबईत येऊन उद्योगपतींना साकडे घालायला काहीच हरकत नाही, पण भाजपने ममतांवर नाहक टीका केली. म्हणून पटेलांचा विषय समोर आणला. योगी आदित्यनाथ तर मुंबईतील सिनेउद्योग लखनौला नेण्यासाठीच आले. त्यावरही भाजपने आक्षेप घेतला नाही. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र एका रात्रीत अहमदाबादला खेचून नेले. त्या लूटमारीवरही भाजपने भाष्य केले नाही, पण ममता बॅनर्जी प्रकरणात भाजपची भूमिका टोकाची आहे. ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या. त्यांनी वादळही निर्माण केले आणि लढण्याची प्रेरणाच देऊन गेल्या.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!