मुंबई : नाशिकच्या साहित्य संमेलनाला आज गालबोट लागले आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली आहे. संभाजी ब्रिगेडच्या या शाई फेकीचे भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समर्थन केले आहे. प्रविण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आले असते पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिले असेल, असं म्हणत प्रविण दरेकरांनी संभाजी ब्रिगेडच्या कृत्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.
https://www.instagram.com/reel/CXGRvo3jMcc/?utm_source=ig_web_copy_link
छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपाहार्य लिहिलं गेलं असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहित असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी प्रविण दरेकरांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गिरीश कुबर यांच्यावर भर संमेलनात शाई फेक
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- ‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’
- ‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा


