Share

कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा राऊतांकडून निषेध

Published On: 

मुंबई : नाशिकच्या साहित्य संमेलनाला आज गालबोट लागले आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली आहे. गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकल्यानंतर राज्यात पुन्हा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या या शाई फेकीचे भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समर्थन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही वादग्रस्त लिखाण केले होते त्यावरून हा सर्व प्रकार सुरू झाला आहे. ‘साहित्य संमेलाच्या ठिकाणी असा प्रकार करणे अत्यंत चुकीचे आहे, यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तर गिरीश कुबेर यांच्या लिखाणामध्ये काही चुका असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे’, असे मत संजय राऊत व्यक्त केले आहे.

मी ते लिखाण अजून मी वाचलं नाही, त्यांच्या लिखाणाबाबत मतभेद असू शकतात, तसेच छत्रपती संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह लिखाण करणे चुकीचे आहे, तसे लिखाण झाल्यास लोकांना वेदना होतात, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर संभाडी ब्रिगेडच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे गिरीष कुबेर यांच्या अंगावर शाई फेकली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर कुबेर यांच्या अंगावर शाई फेकून आम्हाला समाधान वाटले आहे. यासाठी आम्ही फासावरही जायला तयार असल्याचे त्या दोघांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!