🕒 1 min read
मुंबई : किरीट सोमय्या हे नाव राज्याच्या राजकारणात सतत चर्चेत असणारे नाव आहे. किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने पाहायला मिळतात. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची आज बुधवारी पहाटेपासून ईडीने (ED) चौकशी सुरू केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर सोमय्या यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज (बुधवार) रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांच्या कथित घोटाळ्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ईडीच्या चौकशीची माहिती समोर आल्यानंतर भाजपकडून नवाब मलिक यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी मागणी केली जाईल, असे सोमय्या यांनी सांगितले. सोमय्या म्हणाले “माझ्याकडे नवाब मलिक यांच्याविषयी मर्यादित माहिती होती. ती मी तपास यंत्रणेला दिली. नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीकडून जमीन खरेदी केली तेव्हा त्यांना पूर्ण कल्पना होती. पण आपल्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही, असे मलिकांना वाटत होते.”
किरीट सोमय्या म्हणाले, “नवाब मलिक यांची कारस्थान आता जनतेसमोर येत आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, की अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का? याबाबत तपास करावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या माफियाखोरांना मदत करत असतात.”
महत्वाच्या बातम्या :


