🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरावर पहाटे पासून ईडी (ED) ने छापेमारी सुरू केली आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. तसेच आता यामुळे राजकारण आणखी तापण्याचे चित्र दिसत आहे. याच मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे, तसेच नवाब मलिक किंवा आम्ही सातत्याने बोलतोय, सत्य बोलतोय त्यामुळे त्यांच्यामागे ईडी, सीबीआय (CBI) मागे लावली जात आहे. तसेच चौकशी होईल आणि संध्याकाळी नवाब मलिक घरी येतील, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
‘कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स आहे’ – मेधा पाटकर
श्रीलंका विरुद्ध मालिकेआधी भारतीय संघाला दुहेरी झटका; सूर्या आणि चहर मालिकेतून बाहेर!
“विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
“आता पुजारा आणि रहाणेचे संघात पुनरागमन अशक्य”; जडेजाचे वक्तव्य
Nawab Malik ED Inquiry : नवाब मलिक ईडीच्या रडारवर! पहाटेपासून चौकशी सुरू


