🕒 1 min read
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) चौकशी सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार, अशी माहिती नवाब मलिक ट्वीट करून दिली होती. नवाब मलिक यांच्या घरी पहाटे साडेचार वाजता ईडीने धाळ टाकली. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जाते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
शरद पवार म्हणाले, “नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत आहे. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असे म्हटले जाते. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील माझ्यावरही असेच आरोप केले जात होते”
यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचे हे उदाहरण आहे. नवाब मलिक जाहीरपणे बोलतात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले.
जयंत पाटलांची प्रतिक्रिया
जयंत पाटील म्हणाले, “ईडीने स्वतःचे पोलीस आणून कोणीतही माहिती न देता नवाब मलिकांना घेऊन जाणे म्हणजे सर्व गोष्टींची पायमल्ली आहे. नवाब मलिक यांनी काही प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून हे करण्याचा प्रकार आहे. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा प्रकार सुरु आहे. यापुर्वी मलिक यांनी दाऊद व्यवहारांवर उत्तर दिले आहेत. राज्यात यंत्रणाचाअती गैरवापर सुरु आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम आहे.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
