मुंबई: भारतीय संघ या वर्षीच्या टी२० विश्वचषकापूर्वी संघ तयार करण्यासाठी लक्ष देत आहे. मागील T20 विश्वचषकात भारताला गट स्टेजमधून बाहेर पडावे लागले होते. विराट कोहली कर्णधारपदावरून बाहेर पडल्यानंतर सध्याच्या नेतृत्व रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्याकडे आहे. विश्वचषकाआधी टीम काँबिनेशनसाठी सांघट अनेक तरुण खेळाडूंना संधी दिली जात आहे.
नवीन खेळाडूंच्या यादीत ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. ईशान किशनला टी २० मालिकेत खेळायची संधी मिळाली होती. मात्र त्याला चांगले प्रदर्शन करता आले नाही. रोहितने याबाबत त्याला मैदानावर देखील रागावले होते. मात्र कोच द्रविडने त्याला पाठींबा दिला आहे. ते म्हणाले “इशानला त्याची क्षमता, त्याच्या कामगिरीवर निवडण्यात आले आहे. होय, तुम्ही हे अनेक मॅचेस मध्ये ठरवू शकत नाही. कधी ते संयोजनामुळे असते, तर कधी दुखापतीमुळे असते”
राहुल द्रविडने भारतीय संघाआधी बरेच वर्ष अंडर १९ संघ सांभाळले आहे. ज्यामुळे त्यांना युवा क्रिकेटरांच्या मानसिकतेबद्दल जाणीव आहे. द्रविडने यावेळी ऋतुराज आणि आवेश बद्दलही सांगितले. ते म्हणाले “कधीही खेळाडूला सारख्याच संख्याचे सामने खेळू देऊ नका. संख्या दगडात लिखित असू शकत नाही मग ते सात किंवा सहा सामने असतील. मग तो आजचा रुतुराज गायकवाड असो की आवेश खान. आम्ही त्यांना एका सामन्यावर पारखत नाही. ते येथे आहेत कारण ते परफॉर्म करतात आणि संघात असण्पायास पात्र आहेत.”
महत्वाच्या बातम्या
- “२०२४ पर्यंत हे चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत”; संजय राऊतांचा तपास यंत्रणांना इशारा
- ‘कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स आहे’ – मेधा पाटकर
- श्रीलंका विरुद्ध मालिकेआधी भारतीय संघाला दुहेरी झटका; सूर्या आणि चहर मालिकेतून बाहेर!
- “विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “आता पुजारा आणि रहाणेचे संघात पुनरागमन अशक्य”; जडेजाचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

