Share

आमदारांना मोफत घरं देण्याला शरद पवारांचा विरोध!

Published On: 

मुंबई : गेल्या आठवड्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आमदारांसाठी 300 घरे बांधणार असल्याची विधानसभेत घोषणा केली होती. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं होत. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं काही आमदारांनी स्वागत केलं होत. तर काही आमदारांनी त्याला विरोध केला होता.

मात्र महाराष्ट्रातील आमदारांच्या या घरावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र या निर्णयानंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप नेत्यांकडून देखील यावर टीका करण्यास सुरवात झाली आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांनी या प्रकारे आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही, हा निर्णय चुकीचा असल्याचा त्यांनी सांगितलं आहे. केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. शरद पवार यांनी फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांना साठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन ही घरे दिली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या –

“आमचा एकच बसला तर आईचं दूध आठवेल” – तानाजी सावंतांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

IPL 2022 GT vs LSG : गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing XI

VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलनं केलं भारतीय पद्धतीनं लग्न; वरातीत केला डान्स!

“… आणि आमच्या छातीवर नाचतो” – तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा

वाह रे पठ्ठ्या..! बाईक खरेदीसाठी दिले 2 लाखांचे चिल्लर पैसे, शोरूममधील कामगारांना फुटला घाम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!