मुंबई: ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या भारतीय गर्लफ्रेंड विनी रमनशी १८ मार्च रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. ज्याचा फोटो मॅक्सवेल आणि विनीने त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला होता. आता त्यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघे तामिळ रितीरिवाजांनुसार लग्न करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मॅक्सवेल (glenn maxwell) शेरवानी आणि पिवळी धोती परिधान केलेल्या भारतीय वराच्या रूपात दिसत आहे. तो हातात वरमाला घेऊन आपल्या वधूची वाट पाहत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मॅक्सवेल नाचताना आपल्या वधूची वाट पाहत आहे, तर वधू बनलेली विनीही (vini raman) डान्स करताना मॅक्सवेल जवळ पोहोचत आहे.
विनी आणि मॅक्सवेल बराच काळ एकत्र होते आणि दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी १८ मार्च रोजी लग्न केले. मॅक्सवेल केवळ लग्नासाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही आणि त्याने आयपीएल २०२२ चा सलामीचा सामना न खेळण्याचा निर्णयही घेतला. आता लग्न पार पडल्यानंतर तो लवकरच आरसीबी संघाशी जुळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “… आणि आमच्या छातीवर नाचतो” – तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- वाह रे पठ्ठ्या..! बाईक खरेदीसाठी दिले 2 लाखांचे चिल्लर पैसे, शोरूममधील कामगारांना फुटला घाम
- विधानसभेत तुफान हाणामारी; भाजपचे पाच आमदार निलंबित
- ‘KGF Chapter -2’ आला रे …नुसता अॅक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
- जेव्हा शॉ मोहम्मद कैफला म्हणाला ‘मला अंडर आर्म बॉलिंग करा’; जाणून घ्या काय होते कारण


