सोलापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सरकार पाच वर्ष टिकेल असा दावा केला जातो. मात्र तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदारांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरूच असताना पाहायला मिळत आहे.
सोलापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर तानाजी सावंत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तानाजी सावंत यांनी मागील अडीच वर्षात शिवसैनिकांना फोडल्याचे आरोप केले. तसेच पुढे म्हणाले, ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी पाहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यांच्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असं ठरलेलं असताना असं का होतं? आमच्या नादी लागू नका, तुम्ही 100 मारले आणि आमचा एकच दणकट बसला तर आईचं दूध आठवेल, असा इशाराही तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलाय.
“मागील अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल तर विचार करायला हवा. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही. सत्तेत आमच्यासोबत आहात तर आमच्यावर वार का करता? त्यांचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आम्हाला काय? शिवभोजन थाळी चालवा, महिन्याचे बिल येण्याची वाट पाहा. भाजपसोबत सत्तेत असतानाही हेच होत होतं आणि आताही तेच होतंय”, अशा शब्दात सावंत यांनी खंत व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या –
“… आणि आमच्या छातीवर नाचतो” – तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा
वाह रे पठ्ठ्या..! बाईक खरेदीसाठी दिले 2 लाखांचे चिल्लर पैसे, शोरूममधील कामगारांना फुटला घाम
विधानसभेत तुफान राडा; राड्याचं कारण काय? पहा..
‘KGF Chapter -2’ आला रे …नुसता अॅक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
जेव्हा शॉ मोहम्मद कैफला म्हणाला ‘मला अंडर आर्म बॉलिंग करा’; जाणून घ्या काय होते कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

