मुंबई : वानखेडे मैदानावर आज आयपीएलच्या दोन नवीन संघामध्ये लढत होत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सशी भिडत आहे. या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दवाचा परिणाम लक्षात घेता, नंतर फलंदाजी करणारा संघ फायद्यात असतो, हे चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यातून स्पष्ट झाले.
नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने सांगितले, ”हा पहिला सामना आहे. त्यामुळे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वानखेडेशी माझे खास नाते आहे आणि दवही पडेल.” त्याचवेळी केएल राहुल म्हणाला, ”आम्हालाही आधी गोलंदाजी करायची होती. पहिल्या सामन्यात आम्हाला चांगली धावसंख्या करायची आहे. आमच्याकडे नवीन टीम आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला नवीन सुरुवात करायला आवडेल.”
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कप्तान), शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, डेव्हि़ड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन, राशिद खान, मोहम्मद शमी, वरूण आरोन.
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, कृणाल पंड्या, एविन लुईस, दुष्मंथा चमीरा, दीपक हुडा, आयुष बदोनी, आवेश खान, मोहसिन खान, रवी बिश्नोई.
महत्त्वाच्या बातम्या –
- VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलने रचले भारतीय पद्धतीने लग्न; हातात वरमाला घेत डान्सही केला
- “… आणि आमच्या छातीवर नाचतो” – तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- वाह रे पठ्ठ्या..! बाईक खरेदीसाठी दिले 2 लाखांचे चिल्लर पैसे, शोरूममधील कामगारांना फुटला घाम
- विधानसभेत तुफान हाणामारी; भाजपचे पाच आमदार निलंबित
- ‘KGF Chapter -2’ आला रे …नुसता अॅक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

