मुंबई : आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस सतत काहीतरी प्रयत्न करत असतो. आपल्या स्वप्नातील गाडी खरेदी करण्यासाठी या तरुणाने पैसे साठवले आणि शनिवारी त्यानी 1 रुपयाची 2.6 लाख नाणी शोरूममध्ये जमा करून ही दुचाकी खरेदी केली आहे. हे पैसे मोजण्यासाठी शोरूममधील कामगारांना तब्बल 10 तास लागले.
तामिळनाडूतील सेलम शहरात राहणाऱ्या २९ वर्षीय व्ही. बूपाथीने बाइक घेण्यासाठी १ रुपयांची नाणी गोळा केली. बुपती एका खासगी कंपनीत कंप्यूटर ऑपरेटर आहे. तसेच एक यूट्युबरदेखील आहे. बुपतीने सांगितले की, “गेल्या ३ वर्षांपासून बाइकसाठी १ रुपयाची नाणी गोळा करत आहेत. ३ वर्षांपूर्वी बाइक घ्यायची होती. तेव्हा या बाइकची किंमत २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. पण माझ्याकडे पैसे नव्हते, त्यानंतर मी ठरवले की मी प्रत्येकी एक रुपया जमा करीन आणि ही बाइक घेईन.”
बुपतीला बजाज डोमिनार ४०० मॉडेलची बाइक खरेदी करायची होती. बुपथी दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्याच्याकडे पैसे देण्याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा बूपथी याने नाण्यांनी भरलेली मोठी बॅग बाहेर काढली. एवढी मोठी बॅग पाहून शोरूममधील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही नाणी मोजण्यासाठी शोरूममधील कर्मचाऱ्यांनातब्बल १० तास लागले.
महत्वाच्या बातम्या :
विधानसभेत तुफान राडा; राड्याचं कारण काय? पहा..
‘KGF Chapter -2’ आला रे …नुसता अॅक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
जेव्हा शॉ मोहम्मद कैफला म्हणाला ‘मला अंडर आर्म बॉलिंग करा’; जाणून घ्या काय होते कारण
विधानसभेत झाली तुफान हाणामारी; आमदारांनी एकमेकांचे कपडेही फाडले!
IPL 2022: ‘हाथ मत छोडना साथ मत छोडना’ दिल्लीच्या विजयाचे हिरो अक्षर- ललितचा मजेशीर VIDEO पाहिलात का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

