सोलापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सरकार पाच वर्ष टिकेल असा दावा केला जातो. मात्र तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदारांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरूच असताना पाहायला मिळत आहे.
सोलापुरात जाहीरपणे नाराजी शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. म्हणाले , “राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं”, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असल्यामुळे महाविकास आघाडीत निधी वाटपावरुन मोठे मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच पुढे म्हणाले, “आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे, कुणाही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पातही तेच दिसून आलं. 60 ते 65 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 टक्के काँग्रेसला, त्यातही 16 ठक्के पगारासाठी काढावे लागतात. विकासकामाला केवळ 10 टक्के मिळतात. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु”. अशी भूमिका मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या –
विधानसभेत तुफान राडा; राड्याचं कारण काय? पहा..
‘KGF Chapter -2’ आला रे …नुसता अॅक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
जेव्हा शॉ मोहम्मद कैफला म्हणाला ‘मला अंडर आर्म बॉलिंग करा’; जाणून घ्या काय होते कारण
विधानसभेत झाली तुफान हाणामारी; आमदारांनी एकमेकांचे कपडेही फाडले!
IPL 2022: ‘हाथ मत छोडना साथ मत छोडना’ दिल्लीच्या विजयाचे हिरो अक्षर- ललितचा मजेशीर VIDEO पाहिलात का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

