Share

NCP | ‘स्वत:ला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके’ ; राष्ट्रवादीची सत्तधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पामुळे राज्यातील दीड लाख तरूण-तरूणींचा रोजगार गेला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप, टीकांचा वर्षाव केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे आंदोलन –

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राष्ट्रवादी भवन परिसरात राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं आहे. त्यावेळी राष्ट्रवादी युवकांनी घोषणाबाजी केली असल्याचं समजतं आहे. ‘स्वत:ला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके’, असं म्हणत राष्ट्रवादी युवकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो, पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके शिंदे फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी… गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते, स्वतःला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके, ईडी सरकार हाय हाय, अशी घाषणाबाजी राष्ट्रवादी युवकांनी दिली असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्र उभारणार,असं वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितलं आहे. यावरून दुसऱ्या प्रकल्पाचं राज्यातील जनतेला गाजर नका दाखवू, असं म्हणत विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!