Share

शेन वॉर्नच्या निधनानंतर सौरव गांगुलीचे चाहत्यांना आवाहन म्हणाला “आरोग्याला…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शुक्रवारी क्रिकेट जगताने अतुलनीय हिरा शेन वॉर्नला गमावले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याचे कारण त्याचे व्यसन असल्याचे वृत्त येत आहे. याबाबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर वॉर्नची आठवण टाकत चाहत्यांना आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

शेन वॉर्नच्या (shane warne) निधनानंतर बीसीसीआयचे (bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav  ganguly) यांनी सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गांगुलीने लिहिले “माझा विश्वास बसत नाही, तो एक महान खेळाडू होता. आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की जीवनात चांगले आरोग्य याशिवाय दुसरे काहीही नाही आणि त्याबाबत कधीही तडजोड करू नये.”

https://www.instagram.com/p/CasQlfHP3Q3/?utm_source=ig_web_copy_link

सौरव गांगुली यांच्या आधी अनेक खेळाडूंनी शेन वॉर्नला श्रद्धांजली देत ट्विट केले यात सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. सचिनने ट्विट मध्ये लिहले “धक्कादायक आणि दु:खी. वॉर्नी तुझी आठवण येईल. मैदानावर त्याच्या बाहेर तुमच्यासोबत कधीही वाईट क्षण आलेला नाही. तुझ्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरच्या आठवणी नेहमी जपू. भारतात आणि भारतीयांच्या हृदयात तुझ्यासाठी विशेष स्थान आहे.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!