लातूर : पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बुरशीमुळे होते. शेतकऱ्यांनी योग्य उपाय योजना नाही केल्या तर आर्थिक नुकसान भरपाई अधिक प्रमाणात होते आणि कष्टाचे फळ पदरी पडत नाही. तर आहे त्या पिकांचे संगोपन कसे करायचे? बुरशी पासून पिके कशी वाचवायची ? याविषयी शेतकरी वर्गाला माहित असणे गरजेचे असते.
मातीमध्ये अनेक प्रकारच्या बुरशी निर्माण होऊ शकतात. संख्या वाढली की पिकांना बुरशी लागत जाते. व पिक हातातून जाते. बुरशी वाढली की पिकांना झाडांचा अन्नद्रव्य पुरवठा पोहचण्यास अडथळे निर्माण होतात. झाडाची वाढ आहे त्या ठिकाणी राहते व त्याच जागी झाड वाळून जाते. व खोडकुज व मूळकुज लक्षणे दिसू लागतात.
बुरशीचे नियंत्रन असे करा –
शेतीमध्ये एक पिक अनेकवेळा घेणे शेतकरी वर्गाला महागात पडू शकते. पिके बदल राहिले तर रोगराई कमी होऊ शकते व बुरशीचे प्रमाण देखील कमी होते. उन्हाळ्यामध्ये जास्त खोल नांगरण केली तरी बुरशीचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे बुरशी टाळण्यासाठी तुम्हला चांगली खते वापरावी लागतील. यावर उपाय सेंद्रिय खते वापरणे उत्तम ठरू शकेल. बुरशीची वाढ होऊ नये यासाठी सुरुवातीला पेरणीपूर्वी ट्रायकोडार्मा हे जैविक बुरशी जन्य बुरशीनाशकाने प्रक्रिया करा. हे करूनही बुरशी प्रकार जास्त वाढला तर कार्बनडेझीम, कार्बोक्सीन इत्यादींची फवारणी करा.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

