Share

“हा विषय विधानसभेत मांडू,” भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : काल(४ मार्च) डोंबिवलीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. तसेच हा विषय विधानसभेत मांडू, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,‘मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन चार दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही ही शोकाची आणि गंभीर बाब आहे. आरोपीला लवकर अटक झाली नाही तर मी स्वतः डोंबिवलीत येऊन मोर्चा काढीन’, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

दरम्यान, कटके हा भाजपचा समाज माध्यम हाताळत होता. तसेच या घटनेला चार दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांवरील अशा प्रकारचा राजकीय दबाव अधोगतीकडे नेणारा आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!