मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने वादग्रस्त वक्तव्यांची परंपरा कायम ठेवत आणीखी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं होतं. यावरुन मोठा वाद उद्भवला असून सोशल मिडीयावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कंगनाला तरी काही लाज? तिथे टाळ्या वाजवणारेही निर्लज्ज आहेत. तसेच तिला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घेण्यात यावे, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. संजय राऊत मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कंगनाला तरी काही लाज लज्जा… माफी तरी मागावी. ज्या वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावर हा सगळा सोहळा झाला तिथे सर्वांनी टाळ्या वाजवल्या हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे.
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ते भीक होते. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले आहे, अशी मुक्ताफळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने एका कार्यक्रमात उधळली. त्यावरून कंगना टीकेची धनी ठरली आहे. तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने हे आक्षेपार्ह विधान केले. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले.
महत्वाच्या बातम्या
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया
- राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय?- पंकजा मुंडे


