Share

‘मी पुन्हा येऊ का?’ ‘या’ कॉमेडीयने साधला फडणवीसांवर निशाणा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सचिन वाझे आणि परमबीर सिंघ यांच्या लेटरबॉंम्ब प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या दरम्यान विरोधी पक्षाकडून महविकास आघाडी सरकारवर आरोप करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंघ यांनी केलेल्या १०० कोटीच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रया दिली नाही. या कारणामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणामध्ये अहवाल मागवावा, अशी मागणी केली आहे. या भेटीवरुन कॉमेडीयन कुणाल कामराने फडणवीसांनावर निशाणा साधला आहे.

कुणाल कामराने एक ट्विट करत म्हटले आहे की, तुम्हाला आपल्या आयुष्यात जर अनेक गोष्टींमध्ये अपयश येत असल्याचे वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की रोज पहाटे चार वाजता उठून देवेंद्र फडणवीस तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?, असे गमतीशीर ट्विट कामराने केले आहे. कुणाल कामराने केलेल्या या ट्विटला अनेकजणांनी रिट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/kunalkamra88/status/1374588512003977216?s=20

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळी राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. यातच अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवनावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर अजित पवारांनी अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला होता. पहाटेच्या या शपथविधीवरुन कुणाल कामराने त्याचाच संदर्भ देत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!