मुंबई: काल (८ जून) औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी पहिल्यांदाच सेनेच्या मंचावर छत्रपती संभाजी राजेंचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. त्यातच उद्धव ठाकरे शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याबाबत मोठी घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवरच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत टोला लगावला आहे.
“म्हटलं होतं ना, संभाजी महाराजांचा पुतळा स्टेज वर बसवतील पण नामांतराची घोषणा मात्र करणारच नाही.”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान यावेळी सभेत उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं नामकरण होणार आणि हे नामकरण मीच करणार, असल्याचे म्हटले आहे.
म्हटले होते ना…. संभाजी महाराजांचा पुतळा स्टेज वर बसावतील पण नामांतराची घोषणा मात्र करणारच नाही…..#बेगडीहिंदुत्व#सत्तेसाठीलाचार@mnsadhikrut @RajThackeray
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 8, 2022
शहराचं नामकरण मी आताही करू शकतो. पण शहराचं नाव संभाजीनगर करून तुम्हाला पाणी नाही दिलं, रोजगार नाही दिला, रस्ते नाही दिले, तर संभाजी महाराजांना कसं वाटेल? त्यामुळे आधी शहराचा कायापालट केला जाईल, त्यानंतर शहराचं नामकरण करण्यात येईल. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
- “गोपीनाथ मुंडेंनी मागणी करताच बाळासाहेबांनी…” ; उद्धव ठाकरेंनी करुन दिली भाजपला आठवण!
- “भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे…”, मोहम्मद पैगंबरांच्या अवमानावरून उद्धव ठाकरेंनी सुनावले
- “निवडणुका आल्या की धर्माची अफूची गोळी द्यायची ही भाजपची थेरं” ; उद्धव ठाकरे यांचा जोरदार घणाघात
- “…तर संघ काळी टोपी का घालतं?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला सवाल


