Share

“…हेच काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही?”, शालिनी ठाकरे यांचा सवाल

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देत मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी माविआ सरकारवर टीका केली. तसेच हेच काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

यासंदर्भात एका चर्चेत बोलत असतांना शालिनी ठाकरे म्हणाल्या की,‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून बेकायदेशीर भोंग्यांवर जी कारवाई केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हेच काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का जमत नाही? की त्यांना हे करायचेच नाही?’ हा सवाल शालिनी यांनी उपस्थित केला.

दरम्यान, यावेळी शालिनी ठाकरे यांनी राज ठाकरे यांची मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याबाबतची सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच हा कोणताही धार्मिक विषय नसून केवळ सामाजिक विषय आहे, असे मतही त्यांनी मांडले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!