Share

“महाराष्ट्र दिनी तिघाडीला ‘हा’ डोस मिळेलच”, आशिष शेलार यांचा इशारा

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत वाढत्या कोरोना संकटावर चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून काही राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज असल्याचे मोदींनी म्हटले. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावरूनच ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

“कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जनतेने ‘बुस्टर डोस’ वेळीच घेतला पाहिजे. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सुचना पाळल्या पाहिजेत. बाकी राज्यातील आघाडी सरकारला जो ‘डोस’ देण्याची गरज आहे त्याची तयारी आम्ही करतोय. महाराष्ट्र दिनी तिघाडीला हा ‘डोस’ मिळेलच!”, असा इशारा आशिष शेलार यांनी ट्वीट करत दिला आहे.

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मास्क सक्ती पुन्हा करावी, अशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून मागणी करण्यात येत आहे. देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क  सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही याबाबत विचार केला जातोय का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. पुन्हा मास्क सक्ती केल्यास त्याची नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटेल. म्हणून रुग्णसंख्येचा विचार करून मास्क बाबत विचार केला जाईल. अशी माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या तरी मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय झाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर  लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!