मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून येत्या २८ मे रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे हे सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी देखील घेत आहेत. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सायंकाळी चार वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे हे जातपात आणि आरक्षण या मुद्द्यापासून लांब असतात. मात्र, त्यांची गड-किल्ल्यांविषयीची आत्मीयता हि सर्वश्रुत आहे. संभाजीराजे हे देखील गड-किल्ल्ह्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जातपात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जीवलग मित्र होते. दोन्ही घराण्याचं मैत्रीचं नातं आजही काम आहे. राज आणि माझा कॉमन पॉईंट आहे. किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याबाबतही चर्चा झाली,’ असं भाष्य संभाजीराजे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्यात सरसकट लॉकडाऊन उठणार नाहीच – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- १ जूननंतर लगेचच सर्वकाही उघडेल असे नाही; आदित्य ठाकरेंच महत्वाचं विधान
- महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; राणेंच्या विधानाने खळबळ
- ‘भाजप ऐकत नसेल तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’, हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला
- ‘त्या’ शिक्षिकेचं मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदतीसाठी आर्जव; तर राज ठाकरेंनी दिला तत्परतेनं मदतीचा शब्द !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

