Share

१ जूननंतर लगेचच सर्वकाही उघडेल असे नाही; आदित्य ठाकरेंच महत्वाचं विधान

Published On: 

मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. दोन महिन्यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून १ तारखेपासून दुकान उघडणारच असा निर्धार अनेक संघटनांनी केला आहे. यामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे.

‘लोकांचे प्राण महत्वाचे असून मागचा लॉकडाउन हटवल्यानंतर करोना बाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले. आता राज्यात करोना बाधितांची संख्या नक्कीच कमी होतेय, मात्र लगेचच सर्व सुरू केलं जाणार नाही,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ‘मुंबईतील कोरोना संसर्ग देखील नियंत्रणात आला असल्याचे दिसत आहे. मात्र मुंबईतील रुग्ण पूर्ण कसे घटतील याकडे सध्या आम्ही लक्ष देत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत अजूनही १३०० ते १४०० रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या पूर्णपणे कशी कमी होईल हा आमचा प्रयत्न असणार आहे,’ असं देखील ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!