मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला. महाराष्ट्रात कोकणासह मुंबईत या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. या वादळाने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे तत्पर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका वसईतील एका वृद्धाश्रमाला देखील बसला आहे. यात एक वृद्ध नागरिक देखील जखमी झाल्याचं समजतंय. याच वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना शालेय शिक्षण दिलेले शिक्षकही वास्तव्यास आहेत.
वसईतील न्यू लाइफ फाऊंडेशनची वास्तू ही मोडकळीस आली आहे. पुरेशी मदत नसल्याने जवळपास २५ वृद्ध अशाच परिस्थितीत येथे राहत आहेत. याच वृद्धाश्रमात ८८ वर्षीय सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या निवृत्त शिक्षिका देखील राहत आहेत. त्या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील शिक्षण दिलं आहे.
त्यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती. ‘चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालंय. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवलं होतं. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर,’ अशी विनंती वजा साद त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली.
यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्परता दाखवत आपल्या शिक्षिका रणदिवे बाई यांच्याशी संवाद साधला असून तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं आहे. तसेच, कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानंतर भेटायला येईन असं देखील सांगितलं आहे. ‘मनसे नेते अविनाश जाधव यांना मी लगेच मदत करण्यास सांगतो, काळजी घ्या,’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत. कोरोना संकटकाळात विविध क्षेत्रातील नागरिकांना राज ठाकरे यांनी मदत केली होती. आता स्वतःच्या शिक्षिका राहिलेल्या सुमन रणदिवे यांच्या मदतीला देखील ते धावून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- पुनावालांचे देशासाठी भरीव योगदान, त्यांना धमक्या येणं हे गंभीर; तातडीने दखल घ्या : उच्च न्यायालय
- महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; राणेंच्या विधानाने खळबळ
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
