मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली होती. त्यावेळी राजभवनाच्या सचिवालयानं यासंदर्भातील यादी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. राजभवन सुरक्षित ठिकाणाहून फाईल गायब होते. म्हणजे राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवलीये का ? असा सवाल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. ही यादी राजभवनातच सुरक्षित असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं होतं. दरम्यान, आता भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेसह संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
‘महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात ५ तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत? राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी,’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक


