औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळा पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी असताना संभाजीराजेंनी भाजपवरच नाराजी व्यक्त केल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. खासदारकीचा राजीनामा दिल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशी भूमिका देखील त्यांनी व्यक्त केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. राज्यात दौरे करुन किंवा आंदोलन करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही जाधव यांनी म्हटले.
ते आज गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी आणखी आक्रमक भूमिका घ्यावी, असे सुचविले. छत्रपती संभाजी राजेंनी भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा. जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे संभाजीराजे यांचे ऐकत नसतील, भेटत नसतील तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे सांगत नाहीयेत’
- पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितीन राऊत काँग्रेसमध्ये एकाकी? जेष्ठ नेत्यांची साथ मिळेना
- ‘चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची उत्पत्ती झाली का?’, अमेरिकेचा पुन्हा एकदा चीनवर संशय
- ‘आषाढी वारीसाठी पोषक वातावरण आहे का?,’ आळंदी संस्थानचे पालखी मार्गावरील गावांना पत्र
- ‘राजे… वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’


