Share

Shahajibapu Patil | “…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांबाबत शहाजीबापूंचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हापासून ठाकरे गट आणि शिंदे गट झालेले पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करत असतात. अशातच शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटातील आमदारांबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले शहाजीबापू पाटील ?

ठाकरे गटातील आमदार आम्हाला रात्री फोन करतात आणि न्यायालयाच्या निकालानंतर आम्हीही तुमच्या गटात येतो असं म्हणतात, असा खुलासा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. शहाजीबापू यांनी जळगाव येथे सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही शिवसेनेचं काहीही वाटोळं केलं नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या जागी आम्ही शिवसेनेचेच नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आम्ही 50 जण बाजीगर होतो –

शिवसेना पक्ष सोडल्यापासून शिंदे गटातील नेत्यांना गद्दार म्हटलं जात आहे. त्यावरही शहाजीबापूंनी विरोधकांना खडसावलं आहे. आम्ही 50 जण बाजीगर होतो. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका. आम्ही बाजीगर होतो, जातीवंत होतो, मरणाला न घाबरणाऱ्या आमच्या औलादी होत्या. त्यामुळे आमदारक्या आमच्यासाठी गौण आहेत.

याकडे मोठ्या अंतकरणाने बघा-

पुढे बोलतना ते म्हणाले, कोणत्याही आमदारासाठी सगळ्यात आधी जनता असते, त्यानंतर नेता आणि मग पक्ष. त्यामुळे त्याने जनतेशी पहिलं प्रमाणिक रहावं कारण त्यांनीच आपल्याला मुंबईला पाठवलेलं असतं. जनता आमच्या पाठीशी नसती, तर आम्हाला घरात बसावं लागलं असतं. तुम्हीच आम्हाला मुंबईला पाठवलं. त्यामुळे तुमच्या सुख-दु:खाशी आमची नाळ जोडली असून, तुमचे प्रश्न सोडण्यासाठीच आम्ही हे पाऊल टाकलं आहे. याकडे मोठ्या अंतकरणाने आणि मोठ्या मनाने बघा.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!