🕒 1 min read
सातारा : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच रंगल आहे. पक्षनेते सतत विरोधी पक्षनेत्यांवर आरोप, टीका करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. यातच शिवसेना पक्ष मोठा की भाजप पक्ष मोठा?, या प्रश्नाची चर्चाही जोरात सुरू आहे. अशातच याच मुद्यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे.
शिवसेना पुढे की भाजप?-
मी कोणालाही व्यक्तिगत नाव ठेवत नाही. एका घरात जर राजकारण शिरलं तर घोटाळा होतोच होतो. आजोबा आमदार, बाप आमदार आणि नातू पण आमदार अशी महाराष्ट्रात दीडशे घराणी आहेत. ही लोकं राजकारणातून हलायला तयार नाहीत.
मोहिते पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज बाबा हलत नाहीत. अशी घराणे नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत मोजली तर शंभर ते सव्वाशे निघतील. 288 मतदारसंघातले 125 बाजूला काढा. राहिलेल्या खऱ्या निवडणुका. आणि यातूनच ठरवायचं शिवसेना पुढं का भाजप पुढं, असं शहाजीबापू यांनी म्हटलं आहे. साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे येथे शहाजीबापू पाटील यांनी एका वाढदिवसानिमित्त उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांना लगावला टोला-
तसेच,अपशिंगे गावात सहजासहजी कमळ फुलणार नाही. राष्ट्रवादीवाले खूप चालू आहेत. पण प्रयत्न करत राहायचं. आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे मुलाखत घेणे हा प्रकार बोगस असतो सर्व आधीच मॅनेज केलेलं असतं. यामध्ये शरद पवार एकदम भारी. एकाच मतदारसंघात दहा जणांना आधीच कामाला लावतात, असा टोला पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit Somaiya | गणपतीनंतर ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचं ‘हे’ स्मारक जमीदोस्त होणार, किरीट सोमय्या यांचा इशारा
- Shahjibapu Patil। बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा पाया अडीच वर्षापूर्वी उद्ध्वस्त झाला; पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल
- Anna Hazare | “तुम्हाला सत्तेची नशा चढलेली…” ; अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांच्या दारू धोरणावर टीका
- Shahjibapu Patil। “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा, कारण ते बाळासाहेबांच्या…”; शहाजीबापू पाटलांच वक्तव्य
- Chandrakant Patil । कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाटलांनी केलं दुर्लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
