Share

Kirit Somaiya | गणपतीनंतर ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचं ‘हे’ स्मारक जमीदोस्त होणार, किरीट सोमय्या यांचा इशारा

Published On: 

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार यांना गंभीर इशारा दिला आहे. दापोली येथे अनिल परब यांचं असलेलं साई रिसाॅर्ट हे अनाधिकृत स्मारक गणेश उत्सवानंतर पाडण्यात येणार असल्याचा गंभीर इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारला गंभीर इशाराः

मातोश्रीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेलं स्मारक गणपती नंतर जमीनदोस्त होणार असल्याचं किरीट सोमय यांनी म्हटलं आहे. हे पाडल्यानंतर त्या ठिकाणी एक बोर्ड लावण्यास मी विनंती करेल, असं व्यक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. येथे भ्रष्टाचारला जागा नाही असं या बोर्डवर लिहिण्यात यावं जेणेकरून यापुढे कोणीही भ्रष्टाचार करण्याची हिम्मत करणार नाही, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

अनिल परब यांचं साई स्मारक जमीनदोस्त होणारः

हे रिसाॅर्ट पाडण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील सोमय्यांनी दिली आहे. रिसाॅर्ट पाडण्याचं कंत्राट, पाडल्यानंतर होणाऱ्या मलब्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट कुणाला द्यायचे याची प्रक्रिया सुरू असून मला आशा आहे की गणपतीच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि गणपती नंतर तोडण्याची कारवाई होईल, असं किरीट सोमय्या म्हणाले.

मी आतापर्यंत 40 घोटाळे बाहेर काढले ज्यामध्ये सर्व पुरावे देखील दिलेले आहेत. मी कोणाच्या सांगण्यावर हे करत नाही, पक्षाने जे काम दिलं आहे ते करतो. लवकरच मी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन परब व नार्वेकर यांच्या अनाधिकृत बांधकाम जवळ बॅनर लावून महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला जागा नाही, असं फळक लावण्याची विनंती करेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!