🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्लीचे दारू धोरण हे ‘आप’ पक्षासाठी सापळा आहे. जिथे भाजप रोज या मुद्द्यावरून आपवर हल्लाबोल करत आहे. त्याचवेळी समाजसेवक अण्णा हजारे यांनीही दारू धोरणावर नाराज होऊन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात अण्णांनी दिल्लीतील दारूची दुकाने बंद करण्यास सांगितले आहे.
अण्णा हजारे यांनी पत्रात लिहिले, “स्वराज नावाच्या या पुस्तकात तुम्ही किती आदर्श गोष्टी लिहिल्या होत्या. त्यामुळेच तेव्हापासून तुमच्याकडून खूप आशा होत्या. पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही आदर्श विचारधारा विसरलात असे दिसते.”
जशी दारूची नशा असते, तशीच…-
अण्णा हजारे म्हणाले, “जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते. तुम्हालाही अशा सत्तेची नशा चढलेली आहे, असे वाटते. त्यामुळे दिल्ली राज्यात तुमच्या सरकारने नवीन दारू धोरण तयार केले. ज्यातून दारू विक्री आणि मद्यपानाला प्रोत्साहन मिळू शकेल, असे दिसते.”
भ्रष्टाचाराला चालना-
या पत्रात अण्णांनी म्हटले आहे की, “रस्त्यावर दारूची दुकाने सुरू करता येतील. त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळू शकते. हे जनतेच्या हिताचे नाही. एका ऐतिहासिक चळवळीतून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला. हे खूप दुःखी आहे.”
सीबीआय करत आहे या प्रकरणाचा तपास-
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत आरोपांनी घेरले आहे. या धोरणातून पक्षाच्या जवळच्या लोकांना फायदा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासोबतच या धोरणातून मोठा घोटाळा झाल्याचा दावा भाजपने केला आहे. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचवेळी भाजपकडून मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shahjibapu Patil। “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा, कारण ते बाळासाहेबांच्या…”; शहाजीबापू पाटलांच वक्तव्य
- Chandrakant Patil । कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाटलांनी केलं दुर्लक्ष
- Gulabrao Patil | ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण
- Chandrashekhar Bawankule | पवारांनी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या पुढे गेले नाहीत; बावनकुळेंचा टोला
- Chandrashekhar Bawankule | “जेव्हा शरद पवार सत्तेत आले” ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
