🕒 1 min read
कोल्हापूर : भाजप नेते चंद्रकांत पाटील कोल्हापूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांच्यासमोर एका तरुणाने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. मात्र या तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर देखील चंद्रकांत पाटील यांनी या तरुणाची विचारपूस न करता तिथून निघून गेल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या समोर तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्नः
परशुराम नामदेव कांबळे, असं या तरुणाचं नाव आहे. संबंधित तरुणाने जिल्हाधिकारी दालना समोरच अंगावर रॉकेल ओतून जीव देण्याचा प्रयत्न केला. जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपाखाली नोकरी मिळण्याची मागणी करून ही त्याला न्याय मिळत नसल्याने परशुराम यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे हजर असलेल्या पोलिसांनी झडप घेऊन त्याला वेळीच रोखलं. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी एवढी घटना घडूनही त्याची विचारपूस केली नाही.
दरम्यान, याबाबत बोलत असताना आम्ही सर्व कागदपत्र व्यवहार केले. अधिकाऱ्याने आमच्याकडून पैसे घेतले आहेत. मात्र अजूनही न्याय मिळाला नाही, सगळी कागदपत्र आहे माझ्याकडे पण तरीही पालिकेकडून निर्णय घेतला जात नाही. नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनाही भेटलो होतो, मंत्रालयातही अनेक चकरा मारल्या, आमच्याकडे पैसे नाही त्यामुळे मुंबईला सुद्धा जाऊ शकत नाही, अशी अवस्था झाल्याचं तरुणांनी मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Gulabrao Patil | ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण
- Chandrashekhar Bawankule | पवारांनी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या पुढे गेले नाहीत; बावनकुळेंचा टोला
- Chandrashekhar Bawankule | “जेव्हा शरद पवार सत्तेत आले” ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
- Chandrashekhar Bavankule | “राज ठाकरे आमच्या मोठ्या भावासारखे”, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानंतर भाजप – मनसे युतीची चर्चा
- Eknath Khadse | “भाजप-मनसे एकत्र आल्यास…” ; एकनाथ खडसेंची मोठी प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
