Share

SEX TANTRA | लैंगिक प्रशिक्षण देणाच्या ‘या’ जाहिरातीमुळे पुण्यात उडाली खळबळ

Published On: 

पुणे : संपूर्ण जग विविध क्षेत्रांमध्ये कितीही पुढे गेलं, इतकंच नाहीतर माणूस चंद्रावर देखील जाऊन आला. तरी काही गोष्टींबाबतचे आपल्या मनातले ग्रह अजून जुनेच आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेक्स हा विषय येता. सेक्स हा विषय आपल्या भारतात तरी चार-चौघात बोलला जात नाही. म्हणजे हा विषय बोलताना बोलणाऱ्याला आणि त्याचबरोबर ऐकणाऱ्यालाही संकोचित व्हायला होतं. असं असताना इतक्याच सेक्सविषया संदर्भातील जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीमुळे पुणे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचं समजतं आहे.

‘या’ जाहिरातीमुळे पुणे शहरात उडाली खळबळ-

सोशल मीडियावर जी जाहिरात ती सत्यम् शिवम् सुंदरम् फाउंडेशनतर्फे सेक्स प्रशिक्षण कॅम्पची जाहिरात करण्यात आली आहे. हा कॅम्प नवरात्र स्पेशल असून, ही जाहिरात ‘सेक्स तंत्र’ नावाने आहे. या जाहिरातीमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, 1 ते 3 ऑक्टोबरदरम्यान 3 दिवस 2 रात्र लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.

काय आहे ती जाहिरात ?

कॅम्पमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी पद्धत असून त्यासाठी एक क्रमांक दिला गेला आहे. यामध्ये प्रति व्यक्तीकडून १५ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर या कॅम्प दरम्यान वैदिक सेक्स, तंत्रासह चक्र अॅक्टिव्हेशन, ओशो मेडिएशन यासारख्या अनेक गोष्टी शिकविल्या जाणार असल्याचं जाहिरातीमध्ये सांगितलं गेलं आहे.

लैंगिक प्रशिक्षण देणाच्या या जाहिरातीमुळे पुण्यात उडाली खळबळ

तसेच, याविषयी माहिती देताना सायबरचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार चाहने म्हणाले, सोशल मीडियावर ही जाहिरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर आम्ही जाहिरातीतील नमूद क्रमांकावर संपर्क केला. मात्र तो होता. त्यामुळे आम्ही कंपनीला मेल पाठविला असून, त्याचे उत्तर अद्याप आलेलं नाही. त्यामुळे ही जाहिरात फसवणुकीचा नवा फंडा तर नाही ना? अशी शंकाही नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!